करमाळा निकाल जाहीर : ग्रामीण राजकारणात त्रिकोणी समीकरण, सत्ता संतुलन कायम

करमाळा निकाल जाहीर : ग्रामीण राजकारणात त्रिकोणी समीकरण, सत्ता संतुलन कायम
करमाळा (प्रतिनिधी) :- करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा निकाल जाहीर झाला असून यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प. गट) व करमाळा तालुका विकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी प्रत्येकी महत्त्वाच्या जागा जिंकत सत्ता संतुलन राखले आहे.
*जिल्हा परिषद गट निहाय निकाल*
जिल्हा परिषदेच्या 6 गटांमध्ये भाजप, राष्ट्रवादी (अ.प. गट) व करमाळा तालुका विकास आघाडी यांना प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळाला.
*विजयी उमेदवार*
पांडे – रश्मी दिगंबर बागल (भारतीय जनता पार्टी)
वीट – आश्विनी गणेश चिवटे (भारतीय जनता पार्टी)
चिखलठाण – प्रशांत हनुमंतराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अ.प. गट)
कोटीं – वनिता सुभाष गुळवे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अ.प. गट)
वांगी – रुपाली ज्ञानेश्वर गोडसे (करमाळा तालुका विकास आघाडी)
केम – कल्याणी अजित तळेकर (करमाळा तालुका विकास आघाडी)
*पंचायत समिती गण निहाय निकाल*
पंचायत समितीच्या 12 गणांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प. गट) व करमाळा तालुका विकास आघाडी यांनी प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवत समसमान कामगिरी केली.
*विजयी उमेदवार*
रावगाव – सध्या कांबळे (भारतीय जनता पार्टी)
बीट – पूजा सचिन ढेरे (भारतीय जनता पार्टी)
वांगी – सोनाली तकीक (भारतीय जनता पार्टी)
कोर्टी – नाना झाकणे (भारतीय जनता पार्टी)
चिखलठाण – वनमाला चंद्रकांत सरडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अ.प. गट)
हिसरे – भरत आवताडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अ.प. गट)
केतुर – आजिनाथ सर्जेराव विघ्ने (राष्ट्रवादी काँग्रेस – अ.प. गट)
साडे – दशरथ भगवान घाडगे (राष्ट्रवादी काँग्रेस – अ.प. गट)
उमरड – आदिती अतुल पाटील (करमाळा तालुका विकास आघाडी)
जेऊर – ललिता शिरसकर (करमाळा तालुका विकास आघाडी)
केम – ज्ञानेश्वर बिचितकर (करमाळा तालुका विकास आघाडी)
पांडे – स्वप्निल काळे (करमाळा तालुका विकास आघाडी)
*राजकीय चित्र*
करमाळा तालुक्यात यंदा स्पष्ट बहुमत कोणत्याही एकाच पक्षाला मिळाले नसून तिन्ही पक्षांनी समसमान जागा जिंकत सत्ता संतुलन निर्माण केले आहे. त्यामुळे पुढील काळात स्थानिक राजकारणात आघाड्या-उपआघाड्यांची शक्यता वाढली असून विकासकामांवर याचा प्रभाव पडण्याची चर्चा सुरू आहे. विजयी उमेदवारांचे समर्थकांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला असून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाला गती देण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे.




