राजकारण

सोलापूर महानगरपालिकेच्या सात विषय समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर महानगरपालिकेच्या सात विषय समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर, दि. २ : सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आज महानगरपालिका मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात महापौर श्री. विनायक कोंड्याल, उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते श्री. नरेंद्रजी काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका सौ. रोहिणी ताई तडवळकर तसेच इतर पदाधिकारी आणि नगरसेवक-नगरसेविकांच्या समवेत इच्छुक उमेदवारांनी नगरसचिव श्री. प्रवीण दंतकाळे यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले.

यामध्ये स्थापत्य समिती सभापतीपदासाठी विजया चीप्पा, विधी समिती सभापतीपदासाठी सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापतीपदासाठी सुनील खटके, शहर सुधारणा समिती सभापतीपदासाठी स्वाती बडगु, मंडई व उद्यान समिती सभापतीपदासाठी राजशेखर पाटील, कामगार व समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी श्रद्धा पवार तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी निर्मला जंगम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, शहराध्यक्ष तसेच पदाधिकारी व नगरसेवक-नगरसेविकांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेतील विविध विषय समित्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि नागरिकाभिमुख कामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!