सोलापूर

श्री चंद्रकांत भोसले व राजेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कुचन प्रशालेस क्रीडा साहित्य भेट

श्री चंद्रकांत भोसले व राजेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कुचन प्रशालेस क्रीडा साहित्य भेट

सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे प्रशालेचे क्रीडाशिक्षक पवन भोसले यांनी आजोबा चंद्रकांत भोसले व वडील राजेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे क्रीडा साहित्य प्रशालेस भेट दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्थेचे खजिनदार गोवर्धन कमटम होते तर गुरुदेव दुग्धालचे मालक श्री पै. चंद्रकांत मुरलीधर भोसले तसेच श्री राजेश सुभाष भोसले, पवन राजेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या साहित्यामध्ये २० बॅडमिंटन रॅकेट, ४ बॅडमिंटन बॉल , बॅडमिंटन नेट , २ डॉजबॉल नेट व १० डॉजबॉल यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य युवराज मेटे यांनी या क्रीडा साहित्यामुळे विद्यार्थ्यांना विविध खेळांचा सराव करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळणार आहे. तसेच प्रशालेतील बरेचसे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत चमकत असल्याचे सांगितले.

चंद्रकांत भोसले यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिले. तर अध्यक्षीय समारोप करत असताना गोवर्धन कमटम यांनी पवन भोसले यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर विविध शालेय खेळ प्रकारात सहभागी व्हावे. तसेच चालू दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाण्याचे महत्व सांगून पाणी बचत करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. आभार पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक गोकुळ यादव यांनी केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!