क्राईम

बोरामणीत तिहेरी हत्याकांड; आईसह दोन अल्पवयीन मुलांचा निर्घृण खून, सोलापूर हादरले

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित घटना? दिरावर संशय; पोलिसांचा तपास वेगात

बोरामणीत तिहेरी हत्याकांड; आईसह दोन अल्पवयीन मुलांचा निर्घृण खून, सोलापूर हादरले

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित घटना? दिरावर संशय; पोलिसांचा तपास वेगात

सोलापूर, दि. २ (प्रतिनिधी): दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांवर मध्यरात्री झोपेत असताना तलवारीने सपासप वार करून त्यांचा खून करण्यात आला.

मृतांमध्ये गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची मुलगी प्रिया (वय १८) आणि मुलगा शिवराय (वय १६) यांचा समावेश आहे. प्रिया बारावीची विद्यार्थिनी होती, तर शिवराय दहावीचा विद्यार्थी होता.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने घराच्या गच्चीवर प्रवेश करून झोपेत असलेल्या तिघांवर धारदार तलवारीने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला, तर शिवरायचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. ठसे तज्ञ, गुन्हे शाखा आणि इतर तपास पथके घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, मस्के कुटुंबीयांची घरे एकमेकांच्या शेजारी असून शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात सख्ख्या दिरावर संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून विविध कोनातून तपास सुरू आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

• हत्याकांडात मृत्यू पडलेल्या प्रिया सुधाकर मस्के हिला बारावीच्या परीक्षेत मिळाले 68% मार्क..•

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!