सोलापूर

सीईओ कुशल जैन यांचा अचानक दौरा; जिल्हा परिषद वसतीगृहांच्या सुविधांची घेतली कसून चौकशी

विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाला दिल्या तातडीच्या सुधारणा सूचना

सीईओ कुशल जैन यांचा अचानक दौरा; जिल्हा परिषद वसतीगृहांच्या सुविधांची घेतली कसून चौकशी

विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाला दिल्या तातडीच्या सुधारणा सूचना

सोलापूर :-  सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी रविवारी शहरातील जिल्हा परिषद संचलित वसतीगृहांना अचानक भेट देत तेथील व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यात शेळगी येथील मुलींचे वसतीगृह तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) परिसरातील मुलांचे नेहरू वसतीगृह यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

भेटीदरम्यान जैन यांनी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या दैनंदिन अडचणी, गरजा आणि उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारी आणि सूचनांची त्यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

वसतीगृहातील स्वच्छता, निवास व्यवस्था, अन्नाची गुणवत्ता तसेच पिण्याच्या पाण्याची व इतर मूलभूत सुविधांची जैन यांनी बारकाईने तपासणी केली. काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींवर नाराजी व्यक्त करत आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले.

या प्रसंगी वसतीगृह अधीक्षक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, वसतीगृहांची गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

या अचानक भेटीमुळे वसतीगृह व्यवस्थापनात अधिक शिस्त आणि उत्तरदायित्व निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!