सोलापूर

नागरी सुविधांच्या कामांना मिळणार वेग; महापालिकेच्या ताफ्यात सात नव्या बोलेरो दाखल!

महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार,आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत पूजन सोहळा

नागरी सुविधांच्या कामांना मिळणार वेग; महापालिकेच्या ताफ्यात सात नव्या बोलेरो दाखल!

महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार,आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत पूजन सोहळा

सोलापूर : शहरातील नागरी सुविधांची कामे अधिक गतिमान करण्यासह प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या वाहन ताफ्यात सात नवीन बोलेरो वाहनांची भर पडली आहे. तब्बल ५३ लाख ८३ हजार ६०९ रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनांमुळे महापालिकेच्या विविध विभागांना क्षेत्रीय स्तरावर कामकाज करणे अधिक सोयीचे होणार आहे.

महानगरपालिकेच्या ‘इंद्रभुवन’ येथील परिसरात या नवीन वाहनांचा पूजन सोहळा पार पडला. महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून वाहनांचा सेवेत समावेश करण्यात आला.

विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या ऑनलाइन खरेदी पोर्टलच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून ही सातही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. एका बोलेरो वाहनासाठी ७ लाख ६९ हजार ८७ रुपये खर्च आला असून, सात वाहनांच्या खरेदीसाठी एकूण ५३ लाख ८३ हजार ६०९ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, विद्युत, बांधकाम आदी विभागांकडे शहराच्या विविध भागांतील कामांची जबाबदारी आहे. अनेकदा तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करणे, सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेणे तसेच नागरिकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचावे लागते. मात्र, वाहनांची उपलब्धता मर्यादित असल्यास कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असते.

या पार्श्वभूमीवर नव्याने दाखल झालेली सात वाहने महापालिकेच्या विविध विभागांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. शहरातील विविध भागांत अधिकाऱ्यांना सहजपणे पोहोचता येणार असून, नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी, विकासकामांचे निरीक्षण आणि तक्रार निवारणाच्या प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार आहे.

शहराचा विस्तार आणि वाढत्या नागरी गरजा लक्षात घेता महापालिकेच्या यंत्रणेला सक्षम करणे आवश्यक आहे. नवीन वाहनांमुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची हालचाल सुलभ होऊन विविध विभागांमधील समन्वय वाढण्यास मदत होईल. परिणामी, नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यास हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पृथ्वीराज कोंड्याल, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, वाहन विभाग प्रमुख गिरीश पुकाळे, मुन्ना तळीखडे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!