सोलापूर

दोन नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा झाली पाहिजे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

याद्या अपलोड करण्यासाठी शनिवार व रविवारीही प्रांताधिकारी, तहसील कार्यालये सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

दोन नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा झाली पाहिजे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

याद्या अपलोड करण्यासाठी शनिवार व रविवारीही प्रांताधिकारी, तहसील कार्यालये सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

सोलापूर, दि. ३० (जिमाका) : शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याची कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करून २ नोव्हेंबर २०२६ पासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे. याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसील कार्यालये सुरू ठेवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) लक्ष्मण कासेकर, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने, सुमित शिंदे आदी जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थित होते. सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील ९ लाख २० हजार ६६३ शेतकऱ्यांची माहिती अ, ब, क, ड प्रपत्रांमध्ये भरून पाठविण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे सर्व तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने अपलोड कराव्यात. याद्या अपलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती ३० ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावी. या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.

याद्या अपलोड करण्यासाठी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना कार्यालयात बोलावून घ्यावे. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी स्वतः या कामावर लक्ष ठेवून पुढील दोन दिवसांत शंभर टक्के याद्या अपलोड होतील, याची दक्षता घ्यावी. सर्व तालुक्यांत हे काम सुरू झाले असून त्याला अधिक गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. समाईक क्षेत्राच्या प्रकरणांमध्ये संबंधित खातेदारांची संमती मिळेपर्यंत पुढील कार्यवाही करता येणार नसल्याने अशा प्रकरणांचा नियमानुसार पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

*फार्मर आयडीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा*

जिल्ह्यात शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर आयडीची २ हजार ५८ प्रकरणे प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे संबंधित तहसीलदारांनी तत्काळ निकाली काढावीत. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) आणि एसआरचे कामही पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये अग्रीम मदत जमा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन व सूचना केल्या. तसेच फार्मर आयडी आणि डिजिटल क्रॉप सर्व्हेचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कासेकर यांनी एसआरचे कामही संबंधित तहसीलदारांनी निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे सांगितले.

बैठकीत प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी याद्या अपलोड करताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. पुढील दोन दिवसांत शंभर टक्के याद्या अपलोड करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

*******

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!