सोलापूर

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी; ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन

सोलापूर – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (National Quality Assurance Standards – NQAS) राबविण्यात येतात. या अंतर्गत आरोग्य संस्थेचा दर्जा, रुग्ण सुरक्षा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषध व उपकरण व्यवस्थापन, प्रशासन आणि सेवा वितरणाचे सखोल मूल्यांकन करून राष्ट्रीय मानांकन दिले जाते.

या निकषांवर सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत आजअखेर जिल्ह्यातील एकूण ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना (उपकेंद्रांना) राष्ट्रीय NQAS प्रमाणपत्र मिळवून दिले आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद व महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

*NQAS मानांकनाचे प्रमुख फायदे –

१. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित सेवा :* उपकेंद्र स्तरावर रुग्णकेंद्रित, सुरक्षित व दर्जेदार सेवा उपलब्ध होते.
२. सेवा वितरणात सुधारणा :* औषध, उपकरणे, अभिलेख व्यवस्थापन व रुग्ण समाधानात सातत्याने सुधारणा होते.
३. गुणवत्ता प्रोत्साहन निधी :* राष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्थांना NHM च्या नियमानुसार प्रोत्साहन निधी मिळण्यास पात्र ठरतात, ज्याचा वापर पायाभूत सुविधा व रुग्णसुविधा बळकट करण्यासाठी होतो.
४. ग्रामीण जनतेला थेट लाभ :* ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत व विश्वासार्ह आरोग्यसेवा मिळते.

*यशामागील नेतृत्व –

*या यशामागे सोलापूरचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री दीपक वैद्य, उपाध्यक्ष मा. श्री इंद्रजीत पवार व आरोग्य सभापती श्री चेतन सिंह केदार सावंत, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवटशेट्टी, महिला बालकल्याण समितीचे सभापती अमृता वाघे व *मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली* शक्य झाले आहे. *जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव आणि जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक निखिल फताटे* व त्यांच्या संपूर्ण टीमच्या* सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही कामगिरी साध्य झाली.

या यशामध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांचे मोलाचे योगदान आहे.

• “गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा हेच आमचे ध्येय!” •

आजअखेर सोलापूर जिल्ह्यातील ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय NQAS मानांकन प्राप्त झाले आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील उर्वरित सर्व आरोग्य संस्थांनीही हे मानांकन प्राप्त करावे यासाठी आरोग्य विभागामार्फत सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
– श्री. कुशल जैन
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!