सोलापूर

जैन सोशल ग्रुप सेंट्रल सोलापूर यांच्या तर्फे 100 अंध कुटुंबियांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप, लुई ब्रेल अंध विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या अंध दिव्यांग बांधवांना दिवाळीनिमित्त किराणा किट व मिठाई वाटप!

मागील 10 वर्षा पासून सुरू असलेल्याअंध बांधवांच्या आयुष्यात आनंदाचा दीप उजळवणारा भावनिक दिवाळी स्नेह सोहळा संपन्न; १०० हून अधिक कुटुंबांना किट व मिठाईची भेट.

जैन सोशल ग्रुप सेंट्रल सोलापूर यांच्या तर्फे 100 अंध कुटुंबियांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप,
लुई ब्रेल अंध विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या अंध दिव्यांग बांधवांना दिवाळीनिमित्त किराणा किट व मिठाई वाटप!

मागील 10 वर्षा पासून सुरू असलेल्याअंध बांधवांच्या आयुष्यात आनंदाचा दीप उजळवणारा भावनिक दिवाळी स्नेह सोहळा संपन्न; १०० हून अधिक कुटुंबांना किट व मिठाईची भेट.

सोलापूर : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा उत्सव. हाच आनंद अंध आणि दिव्यांग बांधवांच्या दारी पोहोचावा, यासाठी आज सोलापूरच्या दमाणी ब्लड बँक येथे एका अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात जैन सोशल ग्रुप सेट्रल सदस्याच्या आर्थिक सहकार्याने व लुई ब्रेल अंधविकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अंध, गरजू अंध दिव्यांग कुटुंबीयांना किराणा व मिठाई वाटप दिवाळीनिमित्त करण्यात आलेले आहे.

या सोहळ्याला दोन्ही संस्थांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती लावून उपक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये जैन सोशल ग्रुपचे सेंट्रल चे संस्थापक अध्यक्ष केतनभाई महेंद्रभाई शहा, अध्यक्षा संतोषभाभी बंब,सचिव पदमकुमार मेहता,उपाध्यक्ष अशोक छाजेड,संजय शहा, गौतम संचेती,अतुल गांधी, नीलिमा ढाळजी, सुदर्शन कोरापाटी आणि डॉ. आयुषी तोषणीवाल हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच लुई ब्रेल संस्थेचे अध्यक्ष सुरज सोनटक्के, सचिव संतोष देशमुख, महासचिव शिवशंकर पाटील, कोषाध्यक्ष महेश बिराजदार आणि इतर सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्थापक केतनभाई शहा म्हणाले हा उपक्रम मागील 10 वर्षापासून सुरू आहे व या पुढेही सदस्याच्या सहकार्याने सुरू राहील, किराणा किट वाटप मध्ये 20 पेक्षा जास्त किराणा वस्तू देण्यात आल्या. या विशेष कार्यक्रमामध्ये सुमारे १०० अंध, दिव्यांग आणि गरजू कुटुंबीयांना आदराने दिवाळीचे किराणा किट व मिठाईचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित सर्व १५० हून अधिक कुटुंबीयांसाठी संस्थेच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने या सोहळ्याला एका कौटुंबिक आणि आपुलकीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष देशमुख यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत केले. हा संपूर्ण दिवाळी सोहळा व वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,डॉ श्री व सौ विजय ,डॉ दीपक दोशी,राजू वोरा,हेमाबेन व हेतल अवलांनी, श्री व सौ सुभाष लोणावत,निर्मला मेहता, उपस्थित होते, ब्रह्मदेव माने, बसवराज तोडकरी, कमलदीप उंचीकट्टी, सुरेश धर्मसाले यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी मोलाचे परिश्रम व मदत केली.

अंध आणि दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर फुललेली ही दिवाळीची आनंदाची हास्यचित्रे सोलापूरकरांसाठी एक वेगळाच आनंद देऊन गेली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!