वृद्ध शेतकऱ्याला उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा दिलासा; तक्रारीवर तातडीने कारवाईचे आश्वासन
“उन्हात येऊ नका, फोन करा” – शेतकऱ्याच्या मदतीला धावले उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

वृद्ध शेतकऱ्याला उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा दिलासा; तक्रारीवर तातडीने कारवाईचे आश्वासन
“उन्हात येऊ नका, फोन करा” – शेतकऱ्याच्या मदतीला धावले उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सोलापूर :- जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या कार्यालयात आज गुळवंची येथील एक वृद्ध शेतकरी आपल्या शेतातील समस्येबाबत तक्रार घेऊन आले होते. संबंधित शेतकऱ्याच्या शेतात एमएसईबीकडून दोन वीज खांब (पोल) उभारणे आवश्यक असताना प्रत्यक्षात एकच पोल लावण्यात आला आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याची समस्या त्यांनी मांडली.
वृद्ध शेतकऱ्याची अडचण ऐकून उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी तत्काळ त्यांना बसवून घेत धीर दिला. एवढ्या कडक उन्हात स्वतः येण्याऐवजी फोनवर संपर्क साधला असता तरी चालले असते, असे सांगत त्यांनी शेतकऱ्याची विचारपूस केली. तसेच “पोल शिल्लक आहे का?” अशी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आश्वासन दिले.
उपाध्यक्षांनी पुढे सांगितले की, “तुम्ही संबंधित पोल लावण्याबाबत काम सुरू करून घ्या, मी स्वतः बोलतो. लाईन ओढण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेतो. पुढे अशा कामासाठी उन्हात येण्याची गरज नाही, काही अडचण असल्यास थेट फोन करा.”
पुढील संपर्कासाठी त्यांनी आपल्या सहाय्यकाला (पीए) शेतकऱ्याला स्वतःचा मोबाईल नंबर देण्याचे निर्देशही दिले.
दरम्यान, त्या शेतकऱ्याने सांगितले की तो बसने येथे आला असून बसस्थानकापासून कार्यालयापर्यंत रिक्षासाठी २०–२५ रुपये खर्च करावे लागले. परतीसाठीही त्याला तसाच खर्च करावा लागणार होता. यावर उपाध्यक्षांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला देत पुढील वेळी थेट संपर्क साधण्यास सांगितले.
या भेटीच्या प्रसंगामुळे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दाखवलेली कर्तव्य तत्परता याबद्दल संबंधित शेतकऱ्याने कृतज्ञता व्यक्त केली.
प्रशासनातील पदाधिकारी जर अशा प्रकारे जनतेच्या समस्या ऐकून घेत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष यांना भेटायला आलेल्या ग्रामीण नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



