सोलापूरला मिळणार ‘५ स्टार’ दर्जाचे बस पोर्ट ? – भैया चौकातील नरसिंग गिरजी मिलची जागा प्रस्तावित
सोलापूर विकास मंचाची परिवहन मंत्र्यांकडे मागणी; मंगळवेढा रोडमार्गे एस टी वाहतूक सुलभ करण्याचा आराखडा

सोलापूरला मिळणार ‘५ स्टार’ दर्जाचे बस पोर्ट ? – भैया चौकातील नरसिंग गिरजी मिलची जागा प्रस्तावित
सोलापूर विकास मंचाची परिवहन मंत्र्यांकडे मागणी; मंगळवेढा रोडमार्गे एस टी वाहतूक सुलभ करण्याचा आराखडा
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरासाठी अत्याधुनिक रेल्वे स्टेशन जवळ ‘५ स्टार’ दर्जाचा नवीन बस पोर्ट उभारण्याची मागणी.
सोलापूर विकास मंचाने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची हॉटेल बालाजी सरोवर येथे समक्ष भेट घेऊन ही लेखी मागणी अधिकृतरीत्या मांडली.
सोलापूर हे राज्यातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून, सध्या असलेले जुने एस.टी. स्थानक वाढत्या प्रवासी संख्येमुळे अपुरे पडत आहे. तसेच स्थानकाची विद्यमान अवस्था समाधानकारक नसल्याने नागरिकांमध्ये व प्रवाश्यां मध्ये नाराजी आहे. जुळे सोलापूर परिसरात सुद्धा एसटी स्टँड असणे गरजेचे आहे,
नागरिकांनी अनेक वर्षांपासून सोलापूर नवीन बस पोर्टची मागणी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्टेशन जवळील भैया चौक येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या नरसिंग गिरजी (NG) मिलची जागा नवीन बस पोर्टसाठी सुचविण्यात आली आहे. ही जागा सध्या नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (NTC) यांच्या ताब्यात असून,मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्या द्वारे योग्य नियोजन केल्यास बारामती व इंदापूर च्या धर्तीवर तसेच रेल्वे स्टेशन जवळ अत्याधुनिक 5 स्टार बस पोर्ट उभारता येऊ शकते, असे विकास मंचाचे मत आहे.
पंढरपूर च्या आषाढी व कार्तिकी वारी दरम्यान व तुळजापूर च्या नवरात्रीला तसेच अक्कलकोट साठी लाखो भाविक देश भारतातून एस टी स्टँड चा वापर करतात तसेच सध्याच्या एस टी स्टँड वर रेल्वे स्टेशन वरून जाण्या साठी प्रवाश्यांना व भक्तांना रिक्षा द्वारे महागडा प्रवास करावा लागतो,
प्रस्तावित आराखड्यानुसार, सर्व एस.टी. बसेस मंगळवेढा रोडमार्गे शहराबाहेर वळवता येतील, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा मिळण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना हा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर त्यांनी ताबडतोब सेक्रेटरी यांना एनटीसी शी सोबत पत्र व्यवहार करण्याचे आदेश दिले
या भेटीदरम्यान सोलापूर विकास मंचचे केतनभाई शहा, दत्तात्रय अंबुरे वकील, प्रसन्न नाझरे, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या भेटीचे आयोजन करण्यासाठी शिवसेना पक्षाचे नगरसेवक अमोल (बापू) शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.
सदर मागणीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सुटेल व सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



