सोलापूर

सेवाव्रती महेश मालक इंगळे यांचा गौरव म्हणजे त्यांच्या सेवाभावाचा सन्मान!

डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांचे गौरवोद्गार; ‘जगद्गुरू बसवलिंगरत्न’ पुरस्काराने सन्मानित

सेवाव्रती महेश मालक इंगळे यांचा गौरव म्हणजे त्यांच्या सेवाभावाचा सन्मान!

डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांचे गौरवोद्गार; ‘जगद्गुरू बसवलिंगरत्न’ पुरस्काराने सन्मानित

अक्कलकोट : राजकारण, धर्मकारण आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत निष्ठेने कार्य करणारे नगरसेवक तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांनी आपल्या कार्यातून सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे. पदाचा उपयोग स्वतःचे मोठेपण वाढविण्यासाठी न करता सर्वसामान्य नागरिक आणि स्वामीभक्तांच्या सेवेसाठी करणाऱ्या महेश मालक इंगळे यांचा गौरव म्हणजे त्यांच्या सेवावृत्तीचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार नागणसूर येथील श्री जगद्गुरू बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठाचे पीठाधीश डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी काढले.

श्री जगद्गुरू बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ, नागणसूर यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘जगद्गुरू बसवलिंगरत्न’ पुरस्कार डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या शुभहस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महास्वामीजी बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत आणि स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी महेश मालक इंगळे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, अक्कलकोटच्या राजकीय क्षेत्रासोबतच धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करतानाच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून लाखो भाविकांच्या सेवेसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा बसवतत्त्वातील सेवाभावाशी सुसंगत आहे.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील स्वच्छता, शिस्त आणि व्यवस्थापन यांना प्राधान्य देत त्यांनी विविध संस्थांच्या कामकाजातही लक्ष घातले आहे. कै. कल्याणराव इंगळे तंत्र निकेतन महाविद्यालय, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, भक्तनिवास, श्री स्वामी समर्थ रुग्णालय, गोशाळा आणि शिशू विकास मंदिर यांसह स्थानिक श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर व मुरलीधर मंदिर येथील व्यवस्थापन उत्तम प्रकारे राबविण्याच्या कार्यातून त्यांनी स्वामीभक्तांचा विश्वास संपादन केला आहे.

महेश मालक इंगळे हे केवळ पदाधिकारी म्हणून नव्हे, तर सेवेला प्राधान्य देणारे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनासोबत सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन तुप्पीन मठाच्या वतीने त्यांची ‘जगद्गुरू बसवलिंगरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या सेवाकार्याचा गौरव करण्याबरोबरच भविष्यातील सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी अधिक प्रेरणा व बळ देणारा ठरेल, असे आशीर्वचन डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी दिले.

महेश मालक इंगळे यांना प्रतिष्ठेचा ‘जगद्गुरू बसवलिंगरत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याने अक्कलकोट तालुक्यातील विविध स्तरांतील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच देश-विदेशातील स्वामीभक्तांनीही त्यांच्या या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या सेवाकार्याला मिळालेली ही पावती असल्याची भावना नागरिक आणि भक्तांकडून व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, संतोष पराणे, सचिन किरनळ्ळी, श्रीकांत झिपरे, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, सुनील पवार, अंकुश केत, डॉ. राजू मलंग, संतोष जमगे, बाळासाहेब एकबोटे, रमेश शिंदे सर, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, स्वामीनाथ मुसळे आणि बसवराज करूटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नागणसूर परिसरासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरिक आणि स्वामीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक मठाधिपती तसेच संत-महंत यांचेही या सोहळ्याला दिव्य सान्निध्य लाभले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!