राजकारण

मंगळवेढा तालुक्यात भाजपचा झेंडा; जिल्हा परिषदेत सर्व जागांवर विजय

मंगळवेढा तालुक्यात भाजपचा झेंडा; जिल्हा परिषदेत सर्व जागांवर विजय

मंगळवेढा (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत मंगळवेढा तालुक्याचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत जिल्हा परिषदेत सर्व जागांवर विजय मिळवला आहे. पंचायत समितीतही भाजपने बहुमत मिळवत आघाडी कायम ठेवली असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दोन जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती नोंदवली आहे.

*जिल्हा परिषद निवडणूक विभागनिहाय निकाल*

मंगळवेढा तालुक्यातील सर्व 4 पैकी 4 जागांवर भारतीय जनता पार्टीचा विजय झाला.

*विजयी सदस्य*

153 संत दामाजी नगर (नागरिकांचा मागासवर्ग) – भांजे रमेश श्रीमंत (भाजप)

254 हुलजंती (सर्वसाधारण महिला) – दुधाळ संगीता हणुमंत (भाजप)

355 लक्ष्मीदहिवडी (अनुसूचित जाती महिला) – शिवशरण करुणा जनार्धन (भाजप)

456 भोसे (सर्वसाधारण) – खांडेकर प्रदीप वसंत (भाजप)

*पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय निकाल*

एकूण 8 गणांपैकी भारतीय जनता पार्टीने 6 जागांवर विजय मिळवला, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने 2 जागा जिंकल्या.

*विजयी सदस्य*

105 संत दामाजीनगर (नागरिकांचा मागासवर्ग महिला) – शिंदे जयश्री मारुती (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)

106 बोराळे (सर्वसाधारण महिला) – कवचाळे जयश्री संजीव (भाजप)

107 हुलजंती (नागरिकांचा मागासवर्ग) – मल्लाळे अर्जुन तुकाराम (भाजप)

108 मरवडे (सर्वसाधारण महिला) – गणपाटील मोहिनी श्रीकांत (भाजप)

109 संत चोखामेळानगर (सर्वसाधारण महिला) – ताड दिपाली आनंद (भाजप)

110 लक्ष्मीदहिवडी (सर्वसाधारण) – यादव विनायक माधवराव (भाजप)

111 भोसे (सर्वसाधारण) – निकम आप्पासो श्रीमंत (भाजप)

112 रड्डे (अनुसूचित जाती) – कांबळे सुरेश ईश्वर (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)

मंगळवेढा तालुक्यात यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले असून ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा सिद्ध झाली आहे. पंचायत समितीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दोन जागांवर विजय मिळवत स्पर्धा कायम ठेवली.

Oplus_16908288
दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!