राजकारण

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा विजय; राजेंद्र राऊत 365 मतांच्या आघाडीने विजयी

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा विजय; राजेंद्र राऊत 365 मतांच्या आघाडीने विजयी

सोलापूर : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. राऊत यांना एकूण 483 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना 118 मते मिळाली.

मतमोजणीनंतर राजेंद्र राऊत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 365 मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. या निवडणुकीत 13 मते अवैध ठरली.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखत विजयाचा झेंडा फडकवला आहे.

*निवडणूक निकाल*

राजेंद्र राऊत (भाजप) – 483 मते

वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) – 118 मते

विजयाची आघाडी – 365 मते

अवैध मते – 13

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!