Prabuddha Raj

Latest Marathi News

सोलापूर महापालिका निवडणूक : ५६४ उमेदवार अंतिम रिंगणात; आज संध्याकाळी चिन्हांसह अंतिम यादी

Oplus_16908288

सोलापूर महापालिका निवडणूक : ५६४ उमेदवार अंतिम रिंगणात; आज संध्याकाळी चिन्हांसह अंतिम यादी

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची एकूण संख्या १,०९६ इतकी होती. यापैकी ५३२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, ५६४ उमेदवार अंतिमतः निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

अर्ज माघारीनंतर राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक प्रभागांत थेट लढती तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार असल्याने निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान,अंतिम उमेदवारांची चिन्हांसह यादी आज संध्याकाळीपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. या यादीमुळे मतदारांना आपल्या प्रभागातील उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळणार असून, प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती यश मिळते, याकडे सर्वच राजकीय पक्षांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप आणि जनसंपर्क वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.