मोहोळ निकाल जाहीर : काही ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेची झुंज, पण सत्ता भाजपकडे

मोहोळ निकाल जाहीर : काही ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेची झुंज, पण सत्ता भाजपकडे
सोलापूर (प्रतिनिधी):- मोहोळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बहुसंख्य जागांवर विजय मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेनेही विजय मिळवत स्पर्धा कायम ठेवली.
*जिल्हा परिषद निकाल (निवडणूक विभागनिहाय)*
एकूण 6 विभागांपैकी भारतीय जनता पार्टीने 4 जागांवर विजय, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेने प्रत्येकी 1 जागा जिंकली.
*विजयी उमेदवार*
* विभाग क्र. 23 आष्टी – विजयराज मनोहर डोंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 12,617 मते
* विभाग क्र. 24 नरखेड – लखन रमेश शिंदे (भाजप) – 11,223 मते
* विभाग क्र. 25 कामती बु. – विमल तानाजी खताळ (भाजप) – 13,390 मते
* विभाग क्र. 26 पोखरापूर – बालाजी तुळशीराम नरूटे (भाजप) – 11,631 मते
* विभाग क्र. 27 पेनूर – चरण हनुमंत चवरे (शिवसेना) – 10,164 मते
* विभाग क्र. 28 कुरुल – सचिन बिराप्पा जाधव (भाजप) – 11,174 मते
पंचायत समिती निकाल (निर्वाचक गणनिहाय)
एकूण 12 गणांपैकी भारतीय जनता पार्टीने 7 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 3 जागा, शिवसेनेने 1 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने 1 जागा जिंकली.
*विजयी उमेदवार*
गण क्र. 45 आष्टी – अमित मधुकर व्यवहारे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 6,239 मते
* गण क्र. 46 खंडाळी – गणेश उत्तम मुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 5,633 मते
* गण क्र. 47 नरखेड – उलका राजकुमार पाटील (भाजप) – 5,080 मते
* गण क्र. 48 शिरापूर (सो) – निलम नवनाथ मसलकर (भाजप) – 5,193 मते
* गण क्र. 49 सावळेश्वर – पार्वती कालिदास गावडे (भाजप) – 6,061 मते
* गण क्र. 50 कामती बु. – कोमल अंकुश आवताडे (भाजप) – 4,611 मते
* गण क्र. 51 सय्यद वरवडे – बाळासो ज्ञानदेव गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार) – 4,325 मते
* गण क्र. 52 पोखरापूर – संजीव माणिक खिलारे (भाजप) – 7,299 मते
* गण क्र. 53 पेनूर – संगीता संजय वसेकर (शिवसेना) – 5,399 मते
* गण क्र. 54 टाकळी सिकंदर – अमीरिका सहदेव कापसे (भाजप) – 4,644 मते
* गण क्र. 55 कुरुल – धनाजी भागवत माळी (राष्ट्रवादी काँग्रेस) – 5,122 मते
* गण क्र. 56 घोडेश्वर – असलम गफूर चौधरी (भाजप) – 5,908 मते
या निकालामुळे मोहोळ तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने काही ठिकाणी विजय मिळवत स्पर्धात्मक वातावरण कायम ठेवले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला असून विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.




