सोलापूर

सलगरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध वंदनेतून समता आणि बंधुत्वाचा संदेश

अमोल दादा पुटगे मित्रपरिवाराचा पुढाकार; ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सलगरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध वंदनेतून समता आणि बंधुत्वाचा संदेश

अमोल दादा पुटगे मित्रपरिवाराचा पुढाकार; ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे अमोल दादा पुटगे मित्रपरिवाराच्या वतीने १४ ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातील समाजबांधव एकत्र आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच बुद्ध प्रतिमेवर पुष्पवर्षाव करून महामानवांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमातून समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिक यलप्पा पुटगे सर, चिंचल भगळे, बाबुराव पुटगे, मल्लिकार्जुन धसाडे, कल्याणी भगळे आणि शिवकरण शिंगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच बुद्ध प्रतिमेवर पुष्पवर्षाव करून भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

१४ ऑक्टोबर १९५६ हा भारतीय इतिहासातील सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेमुळे देशात बौद्ध धम्माच्या विचारांना नव्याने व्यापक चालना मिळाली. दरवर्षी हा दिवस महाराष्ट्रासह देशभरात श्रद्धा, उत्साह आणि आदराने साजरा केला जातो.

‘धम्मचक्र प्रवर्तन’ म्हणजे धम्माच्या विचारांचा प्रसार आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होय. भगवान गौतम बुद्धांनी दिलेला करुणा, प्रज्ञा, शील, समता आणि बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजापर्यंत पोहोचवला. त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून सामाजिक विषमता, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध समतेच्या मार्गाचा संदेश दिला.

सलगर येथे आयोजित या कार्यक्रमाला लहान बालकांपासून युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाजबांधवांनी एकत्र येत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला. अशा कार्यक्रमांमुळे भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच समाजामध्ये एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढीस लागतो.

अमोल दादा पुटगे मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून महामानवांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने समतेचा विचार आचरणात आणण्याचा आणि सामाजिक एकता अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!