सेवा संकल्प अभियान अंतर्गत जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजावर CEO कुशल जैन यांनी व्यक्त केले समाधान!
रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, औषध विभाग आणि ऑपरेशन थिएटरची पाहणी; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे केले कौतुक

सेवा संकल्प अभियान अंतर्गत जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजावर CEO कुशल जैन यांनी व्यक्त केले समाधान!
रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, औषध विभाग आणि ऑपरेशन थिएटरची पाहणी; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे केले कौतुक
अक्कलकोट : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणे आणि शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे याला जिल्हा परिषद प्रशासनाचे प्राधान्य आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर येथे भेट देऊन आरोग्यसेवा आणि उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

कुशल जैन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. औषध विभाग, ऑपरेशन थिएटर तसेच रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची पाहणी करून आरोग्य केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तेथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असते. रुग्णसेवेला प्राधान्य देऊन नागरिकांना योग्य उपचार व आवश्यक मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी सर्वांनी तत्परतेने कार्य करावे, असे मार्गदर्शन केले.

या दौऱ्यादरम्यान प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री. चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी श्री. शंकर कवितके, गटशिक्षणाधिकारी श्री. प्रशांत आरबाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे आणि आरोग्य विस्तार अधिकारी श्री. भोरे ,
प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी
डॉ.गजानन मारकड
डॉ.आयेशा शेख
डॉ. बसवराज कोणदे आदी
उपस्थित होते.



