राजकारण

अक्कलकोट तालुका निकाल जाहीर: जिल्हा परिषद – पंचायत समितीत भाजप आघाडी; शिवसेनेची जोरदार लढत

अक्कलकोट तालुका निकाल जाहीर: जिल्हा परिषद – पंचायत समितीत भाजप आघाडी; शिवसेनेची जोरदार लढत

सोलापूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2026 तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट वर्चस्व मिळवत बहुमताचा झेंडा रोवला आहे. काही ठिकाणी शिवसेनेनेही दमदार कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली.

*जिल्हा परिषद निकाल*

जिल्हा परिषदेच्या एकूण 6 गटांपैकी भारतीय जनता पार्टीने 4 गटांवर विजय मिळवला, तर शिवसेनेने 2 गट जिंकले.

*विजयी उमेदवार*

गट क्र. 63 चप्पळगाव – श्रीमती शांभवी सचिन कल्याणशेट्टी (भाजप)

* गट क्र. 64 वागदरी – श्री. प्रविण दत्तात्रय तानवडे (शिवसेना)

* गट cr. 65 जेऊर – श्री. विकास शिवसिद्ध बुळ्ळा (भाजप)

* गट cr. 66 मंगरुळ – श्रीमती शिवानी महांतेश स्वामी (भाजप)

* गट cr. 67 नागणसूर – श्री. सिद्धाराम निलकंठ शिवमूर्ती (भाजप)

* गट cr. 68 सलगर – श्री. शिवराज सिद्धाराम म्हेत्रे (शिवसेना)

*पंचायत समिती निकाल*

पंचायत समितीच्या 12 गणांपैकी भारतीय जनता पार्टीने 8 जागांवर विजय मिळवत स्पष्ट आघाडी घेतली, तर शिवसेनेने 4 जागा जिंकल्या.

*विजयी उमेदवार*

* गण क्र.125 चप्पळगाव – श्री. सागर सिद्धप्पा कल्याणशेट्टी (भाजप)

* गण क्र.126 कुरनूर – श्री. विनोद भ्रम्हानंद मोरे (भाजप)

* गण क्र.127 वागदरी – श्री. अप्पासाहेब धोंडप्पा किवडे (भाजप)

* गण क्र.128 शिरवळ – श्री. गणेश शंकर मोरे (शिवसेना)

* गण क्र.129 दहिटणे – श्रीमती आशा चंद्रकांत इंगळे (भाजप)

* गण क्र.130 जेऊर – श्रीमती विमल विलास गव्हाणे (भाजप)

* गण क्र.131 सुलेरजवळगे – श्री. उत्तम पिरप्पा वाघमारे (भाजप)

* गण क्र.132 मंगरुळ – श्रीमती रश्मी सागर हिप्परगी (भाजप)

* गण क्र.133 नागणसूर – श्रीमती वैष्णवी विरभद्र सलगरे (भाजप)

* गण क्र.134 तोळणूर – श्रीमती शितल सिद्धाराम म्हेत्रे (शिवसेना)

* गण क्र.135 सलगर – श्री. भिमण्णा मलप्पा सोलापूरे (शिवसेना)

* गण क्र.136 मुगळी – श्रीमती संगिता शिवानंद पाटील (शिवसेना)

या निकालामुळे ग्रामीण भागात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. शिवसेनेनेही काही महत्त्वाच्या ठिकाणी विजय मिळवत आपली उपस्थिती कायम ठेवली. विजयी उमेदवारांचे समर्थकांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला असून पुढील काळात विकासकामांना गती देण्याचे आश्वासन विजेत्यांनी दिले आहे.

Oplus_16908288

 

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!