राजकारण

दक्षिण सोलापूरमध्ये भाजपचा झंझावात; बहुतेक जागांवर एकहाती विजय

दक्षिण सोलापूरमध्ये भाजपचा झंझावात; बहुतेक जागांवर एकहाती विजय

सोलापूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून दक्षिण सोलापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार कामगिरी करत बहुसंख्य जागांवर विजय मिळवला आहे. बहुतांश निवडणूक विभागांमध्ये भाजप उमेदवार विजयी झाले असून ग्रामीण भागातील सत्ता समीकरणांमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. काही ठिकाणी शिवसेनेलाही मर्यादित यश मिळाले आहे.

*जिल्हा परिषद गट*

जिल्हा परिषद निवडणुकीत बोरामणी येथून नेताजीभाऊ गंगाधर खंडागळे (भाजपा)

कुंभारी येथून श्रुती गेनसिद्ध भोरगुंडे (भाजपा)

वळसंग येथून रामप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी (भाजपा)

मंद्रुप येथून सोनाली परसप्पा कडते (भाजपा)

भंडारकवठे येथून सविता महिंद्र उंबरजे (भाजपा)

हे भाजपचे उमेदवार विजयी झाले.

हत्तूर येथून लक्ष्मीबाई रतिकांत पाटील (शिवसेना)

*जिल्हा परिषद गट एकूण: 6 पैकी 5 भाजप,1 शिवसेना*

*पंचायत समिती निवडणुकीतही भाजपने बहुसंख्य जागा जिंकत वर्चस्व राखले.*

कासेगाव येथून विजय उमाकांत राठोड (भाजपा)

बोरामणी येथून वर्षा सोमनाथ पटणे (भाजपा)

कुंभारी येथून सूरज संजय पाटील (भाजपा)

धोत्री येथून शिल्पा महेश बिराजदार (भाजपा)

वळसंग येथून बलवान लक्ष्मण गोतसुर्वे (भाजपा)

होटगी येथून अंबिका भिमाशंकर पाटील (भाजपा)

हत्तूर येथून पंचप्पा निंब्रु धनशेट्टी (भाजपा)

औराद येथून संदीप अमृत टेळे (भाजपा)

मंद्रुप येथून मळसिद्ध शिवानंद मुगळे (भाजपा)

कंदलगाव येथून प्रियांका रमेश आसबे (भाजपा)

निंबर्गी येथून अंबिका शशिकांत दुपारगुडे (भाजपा)

भंडारकवठे येथून प्रियांका चंद्रशेखर कुबसंगे (शिवसेना)

*पंचायत समिती गण एकूण: 12 पैकी 11 भाजप, 1 शिवसेना*

या निवडणुकीत महिला आरक्षणातून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून ग्रामीण विकास, पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या मुद्द्यांवर मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे चित्र आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृतरीत्या निकाल जाहीर केला असून तालुक्यातील नव्या सत्ता रचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!