“माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा कायम; जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजप मागे”

“माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा कायम; जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजप मागे”
माळशिरस (प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, दोन्ही स्तरांवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा परिषदेत 7 पैकी 6 जागांवर राष्ट्रवादी विजयी झाली असून, भाजपला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले.
*जिल्हा परिषद गटानुसार निकाल*
दहिगाव गट : संस्कृती सातपुते (भाजप)
फोंडशिरस गट : अर्जुनसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी)
मांडवे गट : गौतम माने (राष्ट्रवादी)
संग्रामनगर गट : सुषमा नारनवर (राष्ट्रवादी)
माळीनगर गट : मारुती लोंढे (राष्ट्रवादी)
बोरगांव गट : नागनाथ भोसले (राष्ट्रवादी)
वेळापूर गट : मिनाक्षी मिलिंद सरतापे (राष्ट्रवादी)
*एकूण : 7 पैकी 6 राष्ट्रवादी, 1 भाजप*
दरम्यान, पंचायत समितीच्या 14 गणांपैकी 9 गणांमध्ये राष्ट्रवादी विजयी झाली असून, भाजपला 5 गणांमध्ये यश मिळाले.
*पंचायत समिती गणानुसार निकाल*
गुरसाळे : दशरथ शेळके (भाजप)
दहिगाव : कमल खिलारे (भाजप)
भांबुर्डी : प्रवीण वाघमोडे (राष्ट्रवादी)
फोंडशिरस : सोनल पाटील (राष्ट्रवादी)
मांडवे : राजश्री पालवे (भाजप)
कण्हेर : आनंदराव शेंडगे (भाजप)
लवंग : ऋतुजा पराडे (भाजप)
माळीनगर : महादेव साबळे (राष्ट्रवादी)
बोरगांव : मनिषा नाईकनवरे (राष्ट्रवादी)
जांबूड : आप्पासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
मेडद : युवराज झंजे (राष्ट्रवादी)
संग्रामनगर : निशा गिरमे (राष्ट्रवादी)
वेळापूर : विमल जानकर (राष्ट्रवादी)
यशवंतनगर : वैष्णवी मोहिते-पाटील (राष्ट्रवादी)
*एकूण : 14 पैकी 9 राष्ट्रवादी, 5 भाजप*
या निकालामुळे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय दादांची संघटनात्मक ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. मतदारांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे व नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी विविध ठिकाणी जल्लोष साजरा केला असून, तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



