समाजकार्याचा मोठा सन्मान लवकरच जाहीर होणार… यंदाचे राज्यस्तरीय पुरस्कार कोणाला मिळणार?
सामाजिक न्याय विभागाकडून विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्याची घोषणा

समाजकार्याचा मोठा सन्मान लवकरच जाहीर होणार… यंदाचे राज्यस्तरीय पुरस्कार कोणाला मिळणार?
सामाजिक न्याय विभागाकडून विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्याची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी): समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवकांना गौरविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दरवर्षी विविध प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२४–२०२५ आणि २०२५–२०२६ या आर्थिक वर्षांसाठी राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना खालील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे :
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
* साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
* पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
* संत रविदास पुरस्कार
लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार
* शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
हे पुरस्कार सामाजिक न्याय, समता, शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक चळवळ आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दिले जातात.
इच्छुक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात १५ मार्च २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
*संकेतस्थळावर माहिती उपलब्ध*
पुरस्कारासंदर्भातील सविस्तर जाहिरात, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना शासनाच्या आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे :
https://sjsa.maharashtra.gov.in
समाज परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या कार्याची राज्यस्तरावर नोंद करून घ्यावी, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.



