क्राईम

अक्कलकोटमध्ये मावा- गुटखा विक्रत्यांवर धडक कारवाई; नगरपरिषद व पोलिसांचा संयुक्त छापा

अक्कलकोटमध्ये मावा- गुटखा विक्रत्यांवर धडक कारवाई; नगरपरिषद व पोलिसांचा संयुक्त छापा

अक्कलकोट (प्रतिनिधी):- शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मावा व गुटखा विक्रीविरोधात अक्कलकोट नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. नगरपरिषदेच्या आवाहनानंतरही नियम धाब्यावर बसवून मावा विक्री सुरू ठेवणाऱ्या दुकानांवर छापा टाकून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अक्कलकोट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, आरोग्य अधिकारी नितीन शेंडगे, नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या वतीने शहरात मावा बंदीबाबत स्पष्ट आवाहन करण्यात आले होते. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष करत काही विक्रेत्यांनी सर्रासपणे मावा व गुटखा विक्री सुरूच ठेवली. याची दखल घेत नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्त छापा टाकत संबंधित दुकानांवर दंडात्मक कारवाई केली.

या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मावा व गुटख्यामुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता प्रशासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.

नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, यापुढे मावा किंवा गुटखा विक्री करताना कोणी आढळल्यास यापेक्षा अधिक कडक कारवाई करण्यात येईल व थेट गुन्हे दाखल केले जातील. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!