जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनात 40 तक्रारी अर्ज प्राप्त
जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनात 40 तक्रारी अर्ज प्राप्त
सोलापूर, दिनांक 2 (जिमाका):- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात एकूण 40 तक्रारी प्राप्त झाले आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयानी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिले.
उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून त्यांचे तक्रार निवारणासाठी योग्य ती कारवाई केली. त्यावेळी लोकशाही दिनात उपस्थित सोलापूर विद्यापीठातील लोकप्रशासन व राज्यशास्त्र विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी देखील लोकशाही दिन कार्यक्रमामध्ये काय कामकाज चालते हे पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी मार्गदर्शन केले की, लोकशाही दिन हा जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येत असतो. जिल्हास्तरावर शासकीय कार्यालयामध्ये आपली कामे होत नसतील तर त्याचा तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावयाचा असतो व त्याचे तक्रारींचे निवारण लोकशाही दिनामध्ये केले जाते. येथे अर्ज केल्यानंतर योग्य ती कारवाई होते व आपले काम खात्रीशीररित्या पूर्ण होते असा नागरिकांना विश्वास आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले.
लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी पुढील प्रमाणे…
पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण – 3, महसूल विभाग – 17, जिल्हा परिषद सोलापूर – 5, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी – 2, सार्वजनिक बांधकाम विभाग – 1, सहाय्यक आयुक्त, नगरपालिका प्रशासन – 1, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी – 1, महावितरण – 1, म्हाडा – 1, लिड बँक – 2, अन्न औषध प्रशासन – 1, इतर – 5 असे एकूण 40 तक्रारी अर्ज प्राप्त झाले.
00000



