परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; दूतावासांचे २४x७ हेल्पलाइन क्रमांक जाहीर
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर

परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; दूतावासांचे २४x७ हेल्पलाइन क्रमांक जाहीर
मुंबई (प्रतिनिधी) : मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने संबंधित देशांतील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. विविध देशांतील भारतीय दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि स्थानिक प्रशासन व दूतावासांच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत (ओमान), जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
*महाराष्ट्र शासनाचे आवाहन*
महाराष्ट्र शासनाने परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत सूचनांचे पालन करावे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
राज्य शासन केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी सातत्याने समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
*दूतावासांचे २४x७ हेल्पलाइन क्रमांक*
आपत्कालीन परिस्थितीत खालील संपर्क क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
*रामल्ला (पॅलेस्टाईन)*
फोन : +970592916418
ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
*दोहा (कतार)*
फोन : 00974-55647502
ईमेल : cons.doha@mea.gov.in
*रियाध (सौदी अरेबिया)*
फोन : 00-966-11-4884697
WhatsApp : 00-966-542126748
टोल फ्री : 800 247 1234
ईमेल : cw.riyadh@mea.gov.in
*तेल अवीव (इस्रायल)*
फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in
*तेहरान (इराण)*
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
*अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)*
टोल फ्री : 800-46342
WhatsApp : +971543090571
ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in
*कुवैत*
फोन : +96565501946
ईमेल : community.kuwait@mea.gov.in
*बाहरीन*
फोन : 00973-39418071
*मस्कत (ओमान)*
टोल फ्री : 80071234
WhatsApp : +96898282270
ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in
*जॉर्डन*
फोन : 00962-770 422 276
*बगदाद (इराक)*
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899
वेबसाइट : eoibaghdad.gov.in
ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in
*परिस्थितीवर लक्ष*
भारतीय दूतावास संबंधित देशांतील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून वेळोवेळी अद्ययावत सूचना जारी करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांवरूनच माहिती घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्र व राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.







