देश - विदेश

पुण्यात झाला गौरव सोहळा; सोलापूरच्या युवकाने कमावला लष्कराचा सर्वोच्च सन्मान

भारतीय लष्कराचा प्रतिष्ठित पुरस्कार

पुण्यात झाला गौरव सोहळा; सोलापूरच्या युवकाने कमावला लष्कराचा सर्वोच्च सन्मान

भारतीय लष्कराचा प्रतिष्ठित पुरस्कार

सोलापूर (प्रतिनिधी) :- भारतीय सशस्त्र दलांसोबत कार्य करताना अपूर्व कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण दाखवणाऱ्या एका नागरी अधिकाऱ्याने देशपातळीवर मानाचा सन्मान मिळवला आहे. पुणे येथे कार्यरत असलेले संरक्षण जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांना भारतीय लष्कराकडून प्रतिष्ठित ‘दक्षिणी कमान सरसेनापती प्रशंसा पदक’ प्रदान करण्यात आले आहे.

हा सन्मान दक्षिणी कमांड भारतीय लष्कर चे सरसेनापती, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड, पुणे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्यातील उत्कृष्टता आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली निष्ठा अधोरेखित झाली आहे.

विशेष म्हणजे, सन १९८४ नंतर हा मानाचा सन्मान मिळवणारे अंकुश चव्हाण हे पहिले नागरी संरक्षण जनसंपर्क अधिकारी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल केवळ लष्करापुरती मर्यादित न राहता नागरी सेवेतही प्रेरणादायी ठरत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर गावचे रहिवासी असलेले चव्हाण यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून येत उच्च पदावर कार्य करत हा मानाचा टप्पा गाठला आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ येथून त्यांनी वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्राचे शिक्षण घेतले असून, माध्यम समन्वय आणि संवेदनशील माहितीचे अचूक व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

संरक्षण क्षेत्रातील जनसंपर्क हे अत्यंत जबाबदारीचे काम मानले जाते. अशा परिस्थितीत भारतीय सशस्त्र दलांसोबत प्रभावी समन्वय साधत त्यांनी बजावलेली भूमिका लक्षणीय ठरली आहे. नागरी अधिकाऱ्यांना क्वचितच मिळणारा हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत असून, त्यांच्या यशामुळे सोलापूर जिल्ह्याची मान देशभरात उंचावली आहे.

अंकुश चव्हाण यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!