देश - विदेश

युद्धस्थिती पार्श्वभूमीवर यूएईतील भारतीयांसाठी दुतावास सतर्क; महाराष्ट्र शासनाची व्हॉट्सअॅप हेल्पलाईन जाहीर

युद्धस्थिती पार्श्वभूमीवर यूएईतील भारतीयांसाठी दुतावास सतर्क; महाराष्ट्र शासनाची व्हॉट्सअॅप हेल्पलाईन जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) :- मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अबू धाबी व दुबई येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकार व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने विशेष खबरदारी घेतली आहे. अबू धाबीतील भारतीय दुतावास आणि दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावास सातत्याने भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

अबू धाबीतील भारतीय दूतावास Abu Dhabi तसेच दुबईतील Consulate General of India, Dubai यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही दुतावासाने दिली आहे.

*अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन*

महाराष्ट्रासह देशातील जे नागरिक सध्या यूएईमध्ये आहेत किंवा काही कारणास्तव अडकले आहेत, त्यांनी दुतावासाच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरील अपडेट्स नियमितपणे पाहावेत, असे सांगण्यात आले आहे. परिस्थितीनुसार आवश्यक सूचना व मार्गदर्शन तेथून दिले जात आहे.

*महाराष्ट्र शासनाची विशेष मदत व्यवस्था*

महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य शासनाने विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे:
+971 50 365 4357
(कृपया या क्रमांकावर केवळ मेसेज पाठवावा.)

याशिवाय संबंधित ई-मेल व हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुबईतील इंडियन पिपल्स फोरम, दुबई यांच्याशी सतत संपर्कात असून महाराष्ट्रातील नागरिकांची सुरक्षितता व आवश्यक ती मदत याबाबत आढावा घेत आहेत.

*घाबरू नका, प्रशासन तुमच्या सोबत*

दुतावास व राज्य शासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती मदत तत्काळ पुरविण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!