देश - विदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत तंत्रज्ञानाचा थरार; 2000 ड्रोनने उजळणार आकाश

महामानवाच्या कार्याचा ड्रोनद्वारे साकार होणार दृश्यरूप इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत तंत्रज्ञानाचा थरार; 2000 ड्रोनने उजळणार आकाश

महामानवाच्या कार्याचा ड्रोनद्वारे साकार होणार दृश्यरूप इतिहास

मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईत प्रथमच 2000 ड्रोनचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे हा विशेष कार्यक्रम सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

या अनोख्या उपक्रमाद्वारे महामानवाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार असून, आकाशात 2000 ड्रोनच्या सहाय्याने डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध प्रकाशचित्रे साकारली जाणार आहेत. “संविधान गौरव”, “संघर्षाची गाथा” आणि त्यांच्या कार्याची झलक या ड्रोन शोमधून अनुभवायला मिळणार आहे.

ड्रोन शोबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करताना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हा कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असून, तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!