देश - विदेश

“एक वर्ष सोने खरेदी टाळा”; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचत, मेट्रोचा वापर आणि परदेश दौरे टाळण्याचा सल्ला; हैदराबादच्या सभेत राष्ट्रीय हितासाठी नागरिकांना ‘संकल्प’ करण्याचे आवाहन

“एक वर्ष सोने खरेदी टाळा”; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचत, मेट्रोचा वापर आणि परदेश दौरे टाळण्याचा सल्ला; हैदराबादच्या सभेत राष्ट्रीय हितासाठी नागरिकांना ‘संकल्प’ करण्याचे आवाहन

हैदराबाद :- नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद येथील परेड ग्राउंडवरील जाहीर सभेत देशातील नागरिकांना आर्थिक शिस्त आणि राष्ट्रीय हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय स्वयंस्फूर्तीने स्वीकारण्याचे आवाहन केले. पश्चिम आशियात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात तेलाच्या वाढत्या किमती आणि आर्थिक तणाव लक्षात घेता नागरिकांनी पुढील एक वर्ष देशहितासाठी काही गोष्टींमध्ये संयम बाळगावा, असे मोदी यांनी सांगितले.

सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सोन्याच्या आयातीवर देशाचे मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी नागरिकांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचा संकल्प करावा.” त्यांनी हे आवाहन सक्तीचे नसून राष्ट्रीय जबाबदारी म्हणून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारावे, असे स्पष्ट केले.

इंधन बचतीवर भर देताना मोदी यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठीच करावा, असे सांगितले. “अनावश्यक प्रवास टाळा, शक्य तिथे वर्क फ्रॉम होम आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करा,” असा सल्ला त्यांनी दिला. ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे, तेथील नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण कमी करण्यासाठी खाद्यतेलाच्या वापरातही संयम ठेवण्याची गरज असल्याचे मोदी यांनी नमूद केले. त्याचबरोबर पुढील एक वर्ष परदेश दौरे टाळण्याचेही आवाहन त्यांनी देशवासियांना केले.

“हे कोणतेही सरकारी बंधन नाही. पण जागतिक संकटाच्या काळात प्रत्येक नागरिकाने देशासाठी काही त्याग करण्याची गरज आहे,” असे सांगत मोदी यांनी नागरिकांना ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने पुढे येण्याचे आवाहन केले.

हैदराबाद दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. शहरातील परेड ग्राउंड येथे झालेल्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!