सोलापूर

“अण्णाभाऊ साठे पुतळा ते मरीआई चौक रेल्वे पूल 14 डिसेंबरपासून पाडकाम – 1.5 लाख नागरिकांसाठी पर्यायी मार्गाची तयारी, खासदार प्रणिती शिंदे यांची तातडीची बैठक”

सोलापूर (प्रतिनिधी) :- अण्णाभाऊ साठे पुतळा (भैय्या चौक) ते मरीआई चौक येथील महत्त्वाचा रेल्वे पूल १४ डिसेंबर २०२५ रोजी पाडण्यात येणार असून या दरम्यान अंदाजे १ ते १.५ लाख नागरिकांना वाहतुकीत मोठा अडथळा येणार आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून पर्यायी मार्गाचे नियोजन, रस्त्यांची स्थिती आणि सुरक्षेचे उपाय तपासण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आज रेल्वे विभाग आणि मनपा अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठक घेतली.

बैठकीदरम्यान खासदार शिंदे यांनी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले की,
“पूल पाडकामादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग व्यावहारिक, सुरक्षित आणि चालण्यायोग्य असावा.”

प्रस्तावित पर्यायी मार्ग

मरीआई चौक → नागनाथ मंदिर मार्ग → रेल्वे स्टेशन मागील रस्ता → इराण्णा वस्ती → मोदी अंडरपास → मोदी पोलिस चौकी

या मार्गावरील रस्ता रुंदीकरण, सिग्नल सिस्टम, स्ट्रीटलाइट आणि वाहतूक नियंत्रण कर्मचारी नियुक्तीसाठी मनपा आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बैठक संपल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांसह पर्यायी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या वेळी त्यांनी
्अरुंद ठिकाणी रस्ता वाढवण्याच्या सूचना,सार्वजनिक सुरक्षेसाठी प्रकाशयोजना,वाहतूक शाखेस नियंत्रण टॉवर नियुक्त करण्याची शिफारस अशी अनेक महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

या महत्त्वाच्या पुनर्विचार बैठकीस डॉ. सुजीत मिश्रा (विभागीय रेल्वे व्यवस्थापक) डॉ.सचिन ओंबासे (मनपा आयुक्त) योगेश पाटील (वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक) चेतन नरोटे,माऊली पवार,विनोद भोसले,गणेश डोंगरे,सारिका अकुलवार (नगर अभियंता) यांची उपस्थिती होती.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!