राजकारण

प्रचार थांबला; मतदानाच्या दिवशी जाहिरातींना बंदी, राज्य निवडणूक आयोगाचा आदेश

मुंबई : राज्यभरातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार काल 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता अधिकृतरीत्या संपला. आता मतदानाच्या दिवशी म्हणजेच 2 डिसेंबर 2025 रोजी कोणत्याही प्रकारच्या निवडणूक जाहिराती मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, असा स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.

Oplus_16908288

प्रचार सभा,रॅली,प्रचारफेऱ्या,ध्वनिक्षेपक वापर,वृत्तपत्र जाहिराती,सोशल मीडिया कमर्शियल पोस्ट,टीव्ही/रेडिओ जाहिराती निवडणूक प्रचार समाप्तीनंतर उमेदवार किंवा पक्ष मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी कोणतेही प्रयत्न करू शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाने कठोर शब्दांत सांगितले आहे.

ही कारवाई ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या ‘निवडणुकीतील मीडिया नियंत्रण आणि जाहिरात प्रमाणन आदेश 2025’ नुसार करण्यात आली आहे. या आदेशातील परिच्छेद 16नुसार मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीच्या जाहिराती किंवा प्रचार सामग्री प्रसारित करणे कायद्याने गुन्हा ठरेल.

जर कोणत्याही उमेदवाराने किंवा राजकीय कार्यकर्त्याने या तरतुदींचे उल्लंघन करून जाहिरात प्रसिद्ध केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई,फौजदारी गुन्हा,निवडणूक प्रक्रियेत अपात्रता यांसारख्या उपाययोजना लागू होऊ शकतात, असा इशारा देखील आयोगाने दिला आहे.

२ डिसेंबर २०२५
मतदारांनी शांततेत, निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!