महाराष्ट्र

मंत्रालयात लाच घेताना पकडलेल्या लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द; सखोल चौकशी सुरू

मंत्रालयात लाच घेताना पकडलेल्या लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द; सखोल चौकशी सुरू

मुंबई (प्रतिनिधी) :- अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाच घेताना पकडलेल्या लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित लिपिकाची केवळ चौकशीच नव्हे, तर त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्री झिरवाळ यांनी विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लिपिक राजू ढेरिंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू ढेरिंगे हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ पावले उचलत कडक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे विभागातील कामकाज आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून चौकशी अहवालानंतर संबंधितांवर पुढील कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलता धोरण कायम असल्याचेही स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!