सोलापूर

महाशिवरात्री निमित्त नेहरूनगर येथील श्री काशी विश्वेश्वर लिंगाची महापूजा व महाआरती

महाशिवरात्री निमित्त नेहरूनगर येथील श्री काशी विश्वेश्वर लिंगाची महापूजा व महाआरती

सोलापूर (प्रतिनिधी) :- महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त गुरुदेव सेवा मंडळ, नेहरू नगर येथे श्री काशी विश्वेश्वर लिंग यांची महापूजा व महाआरती कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, गटनेते नरेंद्र काळे, नगरसेवक संगीता जाधव, राजशेखर पाटील, सत्यजीत वाघमोडे, आरती वाकसे, अश्विनी चव्हाण, मधुसूदन जंगम यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील उपस्थित राहणार आहेत.

तसेच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, आप्पासाहेब गंचिनगोटे, उमेश कदम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमात श्री काशी विश्वेश्वर लिंगाची तांदूळ पूजा करण्यात येणार असून सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शन व पूजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मदन पोलके, अशोक भांजे, सुरेश स्वामी, तुकाराम बिराजदार, श्रीकांत कुंभार, गंगाधर पाटील, विश्वनाथ आमणे यांनी केले आहे.

महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या या सोहळ्यामुळे नेहरू नगर परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!