सोलापूर

दुधनीच्या पाणीप्रश्नाला अखेर गती; कुरनूर धरणातील रखडलेल्या कामाची प्रथमेश म्हेत्रेंकडून पाहणी

दुधनीकरांच्या घराघरात पाणी पोहोचविण्यासाठी प्रशासनाला कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना

दुधनीच्या पाणीप्रश्नाला अखेर गती; कुरनूर धरणातील रखडलेल्या कामाची प्रथमेश म्हेत्रेंकडून पाहणी

दुधनीकरांच्या घराघरात पाणी पोहोचविण्यासाठी प्रशासनाला कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना

दुधनी : दुधनी शहरवासीयांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर असलेल्या कुरनूर धरण ते दुधनी शहर पाणीपुरवठा योजनेला पुन्हा गती देण्यात आली आहे. मागील काही काळापासून रखडलेल्या या योजनेच्या कामाला चालना देण्यासाठी शिवसेनेचे प्रथमेश भैय्या म्हेत्रे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

दुधनीकरांनी शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलवर विश्वास दाखवत दिलेल्या जनादेशाची विकासकामांच्या माध्यमातून परतफेड करण्याचा संकल्प प्रथमेश म्हेत्रे यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार शहरातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

याच अनुषंगाने कुरनूर धरण परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामाची प्रथमेश म्हेत्रे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योजनेच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामातील अडचणी, प्रलंबित बाबी आणि पुढील कार्यवाही याबाबतही चर्चा करण्यात आली.

योजनेचे काम अधिक वेगाने पूर्ण करून दुधनी शहरातील नागरिकांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर दुधनी शहरातील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रथमेश म्हेत्रे हे मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दुधनी शहरातील विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दुधनी शहरातील पाणीप्रश्न हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला गती देण्यावर भर देण्यात येत असून, दुधनी शहरातील प्रत्येक घरापर्यंत नियमित पाणी पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

“आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देत दुधनीच्या विकासाची जबाबदारी पार पाडणार,” अशी भूमिका प्रथमेश म्हेत्रे यांनी व्यक्त केली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!