सोलापूर (प्रतिनिधी) :- माळढोक पक्षी अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या अवैध मुरूम उपसा प्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई करत दोन वाहने जप्त केली. मौजे कोंडी येथील गट क्रमांक 166 मध्ये अवैधरीत्या मुरूम काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच वनविभागाने 4 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ही कारवाई केली.
या कारवाईत MH 13 CS 0595 क्रमांकाची जेसीबी आणि MH 25 AJ 0925 क्रमांकाची टिपर जप्त करण्यात आली असून, संबंधितांवर वनगुन्हा दाखल केला आहे.
उपवनसंरक्षक विवेक होशिंग, विभागीय वनाधिकारी संदीप गवारे, तसेच सहाय्यक वनसंरक्षक जयश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोरे यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही कारवाई केली.
गुन्ह्याची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी नान्नज-2 महावीर शेळके, वनरक्षक मारोती मुंडकर, सुधीर गवळी, बाबा साठे, सारंग म्हमाणे, सोमनाथ धारेराव आणि वाहनचालक मारुती गवळी यांनी परिसराला वेढा घालून टिपर आणि कार्यरत जेसीबी अडवून जप्त केली.
संबंधितांवर भारतीय वन अधिनियम 1927 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे दिलीप सौदागर ननवरे बीबी दारफळ टिपर मालक,यशवंत प्रवीण डोंगरे बाळे जेसीबी मालक,प्रेम धर्मा राठोड अकोले काटी टिपर चालक,यासिन मलिक तांबोळी बाळे जेसीबी चालक या कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी नान्नज-1 गुरुदत्त दाभाडे, वनरक्षक कौशल्या बडूरे, सत्वशिला कांबळे, आणि सुनील थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वनविभागाच्या या कारवाईमुळे माळढोक अभयारण्यात वाढत्या अवैध उत्खननाला मोठा प्रतिबंध बसणार असून अभयारण्यातील पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.

More Stories
शिवरस्ता मोजणी प्रकरणात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; भूमी अभिलेख अधिकारी दीड लाखांची लाच घेतांना अटक
जातीवाचक शिवीगाळ, खंडणी प्रकरणात आरोपी निर्दोष — सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाचा निर्णय
लाचेसाठी ‘डील’ आणि केसात हात फिरवत सिग्नल — महिला पोलीस अंमलदार ₹२०,००० घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकली!”