Prabuddha Raj

Latest Marathi News

बे-कायदा शौचालय पाडण्याच्या प्रकारणी नागेश कोरे यांच्यावर गुन्हा दाखल

Oplus_16908288

सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मोजे मजरेवाडी, अंबिका नगर प्रभाग क्र. 5 या भागात नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेमार्फत 10 सीटचे सार्वजनिक शौचालय (५ महिला व ५ पुरुषांसाठी) बांधण्यात आले होते. तथापि, दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.00 ते 5.00 वाजण्याच्या दरम्यान सदर शौचालय जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीररित्या पाडण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

याबाबत मिळालेल्या तक्रारीनुसार आरोग्य निरीक्षक यांनी घटनास्थळी चौकशी केली असता नागेश कोरे यांनी हा अनधिकृत तोडफोडीचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधितांवर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, नागरी सुविधांचे जतन आणि अनधिकृत कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारची तोडफोड शहराच्या मूलभूत सुविधा बिघडवणारी असून संबंधितांवर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

Oplus_16908288