१२ मार्चला पंचायत समित्यांत सभापती – उपसभापती निवड ; जिल्हाधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

१२ मार्चला पंचायत समित्यांत सभापती – उपसभापती निवड ; जिल्हाधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती
सोलापूर ( प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी आवश्यक प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम ६७ व ६८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुकानिहाय अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात येत असून, १२ मार्च २०२६ रोजी संबंधित पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापतींची निवड अधिकृतरीत्या पार पडणार आहे.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी खालीलप्रमाणे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत:
* करमाळा – श्री सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी
* माढा – श्रीमती जयश्री आव्हाड, उपविभागीय अधिकारी (माढा-कुडुवाडी)
* बार्शी – श्री अमोलसिंह भोसले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १)
* उत्तर सोलापूर – श्री सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी (सोलापूर क्र. १)
* मोहोळ – श्रीमती सीमा होळकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ७)
* पंढरपूर – श्री सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी (पंढरपूर)
* माळशिरस – श्रीमती विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी
* सांगोला – श्री भैरप्पा माळी, उपविभागीय अधिकारी (मंगळवेढा विभाग)
* मंगळवेढा – श्री संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३)
* दक्षिण सोलापूर – श्रीमती अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी (रोहयो)
* अक्कलकोट – श्री सुमित शिंदे, उपविभागीय अधिकारी (सोलापूर क्र. २)
*प्रशासनाची तयारी पूर्ण*
नियुक्त अध्यासी अधिकारी शासनाच्या सूचनेनुसार सभापती व उपसभापती निवडीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडतील. निवड प्रक्रियेदरम्यान सदस्यांची उपस्थिती, मतदान पद्धत आणि निकाल जाहीर करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे.
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या नेतृत्वात होणारा हा बदल स्थानिक विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामीण प्रशासनाच्या कामकाजासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. १२ मार्च रोजी होणाऱ्या निवडीकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.



