मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जिल्हा परिषदेच्या वारी नियोजनाचे कौतुक; स्वागताचा मान दीपक वैद्य व इंद्रजीत पवार यांना
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात आगमन; स्वागताचा क्षण समाजसेवेची नवी प्रेरणा देणारा असल्याची इंद्रजीत पवार यांची भावना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जिल्हा परिषदेच्या वारी नियोजनाचे कौतुक; स्वागताचा मान दीपक वैद्य व इंद्रजीत पवार यांना
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात आगमन; स्वागताचा क्षण समाजसेवेची नवी प्रेरणा देणारा असल्याची इंद्रजीत पवार यांची भावना
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी तसेच शासकीय महापूजेसाठी पंढरपूर येथे आलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या विविध सुविधा आणि नियोजनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत त्याचे विशेष कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा हा क्षण आपल्या सार्वजनिक जीवनातील संस्मरणीय अनुभव असल्याचे सांगताना उपाध्यक्ष इंद्रजीत पवार म्हणाले की, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची संधी लाभणे हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. या भेटीतून समाजहितासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे.”

यावेळी उपस्थित असलेले विनायक सुतार यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “एका सामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचा मान मिळणे ही आयुष्यातील अविस्मरणीय पर्वणी आहे. हा क्षण कायम स्मरणात राहील.”
या स्वागत सोहळ्याला आमदार राजा राऊत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असून, त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.



