महाराष्ट्र

सीईओ कुशल जैन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर दखल; सोलापूर जिल्हा परिषदेच्या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना प्रथमच NQAS मानांकन

सीईओ कुशल जैन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांवरील भरामुळे जिल्ह्याने रचला ऐतिहासिक विक्रम

सीईओ कुशल जैन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर दखल; सोलापूर जिल्हा परिषदेच्या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना प्रथमच NQAS मानांकन

सीईओ कुशल जैन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांवरील भरामुळे जिल्ह्याने रचला ऐतिहासिक विक्रम

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्रभावी नियोजन आणि गुणवत्तापूर्ण प्रशासनामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) सुरू झाल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेच्या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळवून जिल्ह्याचा नवा इतिहास घडविला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांमध्ये रुग्ण सेवा, स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, औषध व्यवस्थापन, सेवा वितरण, प्रशासन, नोंदवही व्यवस्थापन आणि नागरिकाभिमुख सुविधा यांचे अत्यंत कठोर निकषांवर मूल्यमापन केले जाते. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत मुस्ती, येवती आणि औंधी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त केले.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि महानगरपालिका आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य संस्थांपैकी राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळविणारा एकमेव विभाग म्हणजे सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग ठरला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

या यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा हा प्रशासनाचा केंद्रबिंदू ठेवत केलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित आढावा बैठका, प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी हे महत्त्वाचे घटक ठरले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या त्यांच्या ध्येयवादी भूमिकेमुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

*राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त आरोग्य मंदिरे*

१.  मुस्ती (प्रा. आ. केंद्र बोरामणी, दक्षिण सोलापूर) – ८४.३१%

२.  येवती (प्रा. आ. केंद्र पाटकुल, मोहोळ) – ८३.७३%

३.  औंधी (प्रा. आ. केंद्र अंकोली, मोहोळ) – ८२.००%

या मानांकनामुळे संबंधित आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विशेष गुणवत्ता प्रोत्साहन निधी मिळणार असून, त्यातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा आणि रुग्ण सेवांमध्ये अधिक सुधारणा होणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच अधिक सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

या ऐतिहासिक यशामध्ये राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांनी मोलाचे योगदान दिले आहे.

मात्र या संपूर्ण यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, गुणवत्तेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य आणि परिणामकारक प्रशासन हीच सर्वात मोठी प्रेरणादायी ताकद ठरल्याची भावना आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!