सोलापुरात ९ ऑगस्ट रोजी श्रीकाशीपीठ पुरस्कार वितरण सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव
जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते पुरस्कार प्रदान
सोलापुरात ९ ऑगस्ट रोजी श्रीकाशीपीठ पुरस्कार वितरण सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव
जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते पुरस्कार प्रदान
सोलापूर, दि. ७ : श्री जगद्गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन, जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्या वतीने श्रीकाशीपीठ विविध पुरस्कार २०२६ वितरण समारंभाचे आयोजन रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता वीरतपस्वी सांस्कृतिक भवन, भवानी पेठ, एस.व्ही.सी.एस. शाळेजवळ, सोलापूर येथे करण्यात आले आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी तसेच श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या अमृतहस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच श्री ष. ब्र. १०८ राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज (बार्शी) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यंदाच्या श्रीकाशीपीठ विविध पुरस्कार २०२६ अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कारार्थी खालीलप्रमाणे
• डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार – डॉ. सौ. अपर्णा जिरवणकर (संभाजीनगर)
• वे. मू. वीरसंगय्या स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार – श्री. शांतय्या गुरय्या स्वामी (सोलापूर)
• वे. मू. सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार –
२०२४ : प्रज्ञा उत्तम तोंडले (सोलापूर)
• २०२५ : ऋतुजा शंकर उडवे (सोलापूर)
• २०२६ : मानसी शशिकांत पाटील (सोलापूर)
• वे. मू. बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार – श्री. सिद्धय्या स्वामी हिरेमठ (सोलापूर)
• विठाबाई देवाष्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार – श्री. अमोल चाफळकर (सोलापूर)
• सिद्रामप्पा (दादा) भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार – डॉ. श्री. शिरीष देखणे (सोलापूर)
• शांताबाई व निवृत्ती गायकवाड (स्वकुळ साळी समाज) कीर्तनकार पुरस्कार – ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर (धाराशिव)
• श्री ष. ब्र. परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार – श्री. सिद्धाराम पाटील, संपादक, दैनिक सकाळ, सोलापूर.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अनिल सर्जे, डॉ. शैलेश पाटील, बाबूराव मैंदर्गीकर आणि राजेंद्र बलसुरे यांनी केले असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, पुरस्कारार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




