पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचा वनवास संपणार ..!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले लक्ष
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचा वनवास संपणार ..!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले लक्ष
*कृती समितीचे शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा*
पंढरपूर – महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यातील 969 कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करणेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याबाबत त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास दिल्या आहेत.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता शासकीय विश्रामधाम येथे कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड कार्याध्यक्ष सचिन जाधव, जलजीवन मिशन चे शंकर बंडगर, वाॅश पीएमयु चे आनंद मोची यांनी भेटून निवेदन दिले. या प्रसंगी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, आमदार राजाभाऊ खरे, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर, पंढरपूर चा नगराध्यक्षा प्रणिता भालके उपस्थित होत्या.

राज्यात जवजीवन मिशन अंतर्गत जिल्हा स्तर व तालुका स्तरावर गेल्या 14 वर्षा पासून कर्मचारी कार्यरत आहेत. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात २०५ कर्मचारी कार्यरत असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष रमांकात गायकवाड यांनी सांगितले.
गेल्या वर्षी अपंग समावेशित शिक्षणचे दहा वर्षे सेवा पूर्ण झालेले साडेतीन हजार कर्मचारी आपण कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट केले आहेत.
जुलै 2026 मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 3500 कंत्राटी कर्मचारी नियमित सेवेत सामावून घेतले आहेत.ू
मागील महिन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 14 हजार कर्मचारी आपण शासन सेवेत नियमित केलेले आहेत.
वरील सर्व विभाग हे आपल्याच मंत्र्याकडे आहेत. पाणी व स्वच्छता क्षेत्रात मागील 22 वर्षापासून कार्यरत असणारे 969 कर्मचारी यांची सेवा दहा वर्षापेक्षा अधिक सेवा झाली आहे. यांना आता आपण कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून पांडुरंगाचा आणखी चांगला आशीर्वाद घ्यावा असे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटवून सांगितले. वाॅश पीएमयू च्या
कर्मचारी यांची सेवा पुर्वरत सुरू करणेची मागणी देखील या प्रसंगी करणेत आली. कृती समितीचे उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत व उपाध्यक्ष बंडू हिवरे, अजय राऊत, दिलीप मस्के, निखील रौंदाळकर नागपूर यांचे सहकार्य मिळाले.
खासदार श्रींकात शिंदे यांचेशी सकारात्मक चर्चा
राज्य कृती समतीच्या वतीने खासदार श्रींकात शिंदे यांचेशी अध्यक्ष रमाकांत कायकवाज व कार्याध्यक्ष सचिन जाधव व शंकर बंडगर यांनी चर्चा करून प्रश्न समजावून सांगितला. केंद्राची बदलती धोरणे लक्षात घेता शासन सेवेत कायम करणेची मागणी करणेता आली. पुढीस आठवड्यात या वर मुंबई येथे बैठकीचे करण्यात आले असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.



