सोलापूर

पत्रकारितेतील योगदानाची दखल! शेखर गोतसुर्वे, संदीप येरवडे यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार जाहीर

बहुजन शिक्षक महासंघाच्या जिल्हास्तरीय पुरस्कारांची घोषणा; शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांचाही होणार गौरव, २४ नोव्हेंबरला सोलापुरात ११ वा पुरस्कार वितरण सोहळा

पत्रकारितेतील योगदानाची दखल! शेखर गोतसुर्वे, संदीप येरवडे यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार जाहीर

बहुजन शिक्षक महासंघाच्या जिल्हास्तरीय पुरस्कारांची घोषणा; शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांचाही होणार गौरव, २४ नोव्हेंबरला सोलापुरात ११ वा पुरस्कार वितरण सोहळा

सोलापूर : पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये दैनिक केसरीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी शेखर गोतसुर्वे आणि दैनिक जनसत्यचे पत्रकार संदीप येरवडे यांची विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, जनसामान्यांचे प्रश्न मांडणे आणि लोकशाहीतील चौथ्या स्तंभाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणे, या कार्याचा गौरव या पुरस्कारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन्ही पत्रकारांची पुरस्कारासाठी निवड झाल्याने पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने यंदा ११ व्या वर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे जाहीर केली. विविध क्षेत्रांत निष्ठेने आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे खालीलप्रमाणे :

•  तथागत गौतमबुद्ध विशेष जीवन गौरव पुरस्कार : प्रा. अशोक पाचकुडवे (सेवानिवृत्त सहशिक्षक, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला, मोहोळ).
•  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार : शेखर गोतसुर्वे (जिल्हा प्रतिनिधी, दैनिक केसरी) आणि संदीप येरवडे (पत्रकार, दैनिक जनसत्य).
•  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार : औदुंबर जाधव, रविंद्र बागाडे, नवनाथ भोसले, प्रा. स्वप्निल भालेराव, राजेंद्र सोरटे, गौतम सोनवणे आणि धेरप्पा तळळे.
•  क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार : मंगल शिवशरण.
• राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार : समीर शेख, माधव माने, बाबुराव हिप्परगी, एकोराम चौगुले आणि अशोक ठाकरे.

विशेष म्हणजे, महासंघाच्या संघटनात्मक वाटचालीत मोलाचे योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता शिक्षक, कर्मचारी, पत्रकार आणि संघटनात्मक कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान करणारा ठरणार आहे.

महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याची महासंघाची ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे. ११ व्या वर्षातील या पुरस्कार सोहळ्याकडे जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!