सोलापूर

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कुचन प्रशालेतील नंदेश माशाळकरला कांस्यपदक-

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कुचन प्रशालेतील नंदेश माशाळकरला कांस्यपदक-

सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण, सोलापूर येथील इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी नंदेश माशाळकर याने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील तलवारबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सेबर प्रकारातील सांघिक गटात कांस्यपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे कुचन प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नंदेशने आपल्या उत्कृष्ट खेळाचे कौशल्य, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत हे यश संपादन केले.राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवून नंदेशने प्रशालेच्या यशस्वी क्रीडा परंपरेत भर घातली आहे. भविष्यातही त्याने अशीच उज्ज्वल कामगिरी करून प्रशालेचा आणि सोलापूरचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रशालेसह सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नंदेशच्या या यशाबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली तसेच संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु, प्रणिता सामल आणि मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षकांनीही नंदेशचे विशेष कौतुक केले.

नंदेशला क्रीडा शिक्षक पवन भोसले, गोकुळ यादव आणि सागर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशात मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!