दोन लाख वाचकांचा विश्वास; ‘दैनिक प्रबुध्द राज’ची सकारात्मक पत्रकारितेकडे दमदार वाटचाल
सकारात्मक, निर्भीड आणि लोकहिताच्या पत्रकारितेवर वाचकांचा वाढता विश्वास

नऊ महिन्यांत दोन लाख वाचकांचा टप्पा; ‘दैनिक प्रबुध्द राज’ची दमदार घोडदौड
सकारात्मक, निर्भीड आणि लोकहिताच्या पत्रकारितेवर वाचकांचा वाढता विश्वास
सोलापूर : नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या ‘दैनिक प्रबुध्द राज’ या डिजिटल न्यूज पोर्टलने अवघ्या नऊ महिन्यांत दोन लाखांहून अधिक वाचकांचा टप्पा पार करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पोर्टलवरील व्हिजिटर काउंटरनुसार २,००,०४३ हा आकडा गाठला असून, ही वाढ वाचकांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती मानली जात आहे.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक माध्यमविश्वात सत्य, निष्पक्ष आणि सकारात्मक पत्रकारिता जपणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, दैनिक प्रबुध्द राजने सुरुवातीपासूनच सामाजिक, शैक्षणिक, शासकीय तसेच जनहिताच्या बातम्यांना प्राधान्य देत विश्वासार्ह पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला आहे.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती, संस्था, विद्यार्थ्यांची यशोगाथा, शासकीय योजना, लोकहिताचे निर्णय आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या बातम्यांमुळे पोर्टलने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दोन लाख वाचकांचा टप्पा गाठणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असली, तरी ही जबाबदारी अधिक वाढवणारी आहे. यापुढेही अधिक वेगवान, अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह बातम्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा संकल्प कायम राहील.
दैनिक प्रबुध्द राजवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, पत्रकार, प्रतिनिधी आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सहकार्यामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला. भविष्यातही आपल्या विश्वासाला पात्र ठरत समाजहिताची, सकारात्मक आणि जबाबदार पत्रकारिता करण्याचा आमचा प्रयत्न अविरत सुरू राहील.
“आपला विश्वास… आमची जबाबदारी!”
दैनिक प्रबुध्द राज – सत्य, सकारात्मकता आणि जनहितासाठी सदैव कटिबद्ध.



