सोलापूर

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांवर भर; आरोग्य, शिक्षण व आर्थिक विषयांवर महत्त्वाचे निर्णय

विकासकामांचा आढावा, ग्रामविकास निधी, जमा-खर्च मंजुरी आणि शासन निर्णयांची नोंद; विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांवर भर; आरोग्य, शिक्षण व आर्थिक विषयांवर महत्त्वाचे निर्णय

विकासकामांचा आढावा, ग्रामविकास निधी, जमा-खर्च मंजुरी आणि शासन निर्णयांची नोंद; विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत जिल्हा परिषदेच्या विकासात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, वित्तीय नियोजन तसेच विविध विभागांच्या कामकाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय प्रक्रियेला गती देण्यात आली.

बैठकीत आरोग्य विभागाच्या औषध साठ्याच्या सुरक्षित व शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गोदाम उभारण्याचा विषय प्राधान्याने चर्चिला गेला. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मौजे शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींच्या सुविधा आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी कायमस्वरूपी महिला अधीक्षक (रेक्टर) नियुक्त करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. तसेच दि. २५ जून २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती बैठकीचे कार्यवृत्त वाचून ते कायम करण्यात आले.

बैठकीदरम्यान शासनाकडून प्राप्त विविध महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांची नोंद घेण्यात आली. विविध विभागांकडून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन कामांची प्रगती, निधीचा वापर आणि पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

याशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जमा-खर्चाच्या विवरणपत्रांना मंजुरी देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. जिल्हा ग्रामविकास निधीची माहिती अवलोकन करून त्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा झाली. जुलै २०२६ महिन्यात झालेल्या विविध विषय समित्यांच्या बैठकींच्या कार्यवृत्ताची नोंद घेण्यात आली. तसेच साप्रवि-१ विभागातील अद्ययावत लेखा नोंदवह्यांचाही आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार,शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, वित्त व लेख अधिकारी मिनाक्षी वाकडे, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!