सोलापूर

सेटबॅकमधील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा घाव! प्लिंथ इंटिमेशन सक्तीचे, नियमभंगास लाखोंचा दंड

सेटबॅकमधील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा घाव!
प्लिंथ इंटिमेशन सक्तीचे, नियमभंगास लाखोंचा दंड

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरात वाढत चाललेल्या सामासिक अंतरातील (Setback) अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने अत्यंत महत्त्वपूर्ण व कडक निर्णय घेतला आहे. यापुढे Plinth Intimation (प्लिंथ इंटिमेशन) देणे सक्तीचे करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या दि. ०१ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार, सोलापूर महानगरपालिकेत UDCPR नियमावलीनुसार संगणकीय प्रणाली (BPMS) द्वारे बांधकाम परवानग्या दिल्या जात आहेत. नोंदणीकृत लायसन्स इंजिनीअर अथवा आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर होतो आणि APPENDIX ‘B’ (Form for Supervision) सादर करून नगररचना विभागाकडून मंजुरी दिली जाते.

अलीकडच्या काळात मंजूर नकाशानुसार आवश्यक असलेले सामासिक अंतर न ठेवता वाढीव बांधकाम केल्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे अनियमित व अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ११ जुलै २०२५ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले होते. आता त्या परिपत्रकात सुधारणा करत UDCPR नियम २.८.४ नुसार Appendix-F नमुन्यात Plinth Intimation देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Plinth Intimation ही संबंधित Architect / Licensed Engineer / Supervisor यांच्याकडून प्रमाणित असावी लागणार असून, मंजूर नकाशानुसारच प्रत्यक्ष बांधकाम सुरू असल्याची हमी त्यामध्ये द्यावी लागेल. यासाठी Geo-tag फोटोसह BPMS पोर्टलवर ऑनलाईन माहिती सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Plinth Intimation न सादर करता बांधकाम सुरू असल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली आहे —

🔸 ५०० चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी :

▪ पहिला टप्पा – ₹५,०००/-
▪ दुसरा टप्पा – ₹२५,०००/-
▪ तिसरा टप्पा – ₹१,००,०००/-

🔸 ५०० चौ.मी. पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी :
▪ पहिला टप्पा – ₹१०,०००/-
▪ दुसरा टप्पा – ₹५०,०००/-
▪ तिसरा टप्पा – ₹२,००,०००/-

चौथ्यांदा नियमभंग झाल्यास संबंधित इंजिनिअर/आर्किटेक्टची नोंदणी ६ महिन्यांसाठी निलंबित करून BPMS प्रणालीवर “Hold” करण्यात येणार आहे. पाचव्यांदा नियमभंग झाल्यास ५ वर्षांसाठी नोंदणी निलंबित केली जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, Plinth Intimation १०० टक्के पूर्ण झाल्यानंतरही सेटबॅक किंवा अन्य बांधकाम नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर पुन्हा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने सर्व मिळकतधारक, बांधकाम व्यावसायिक व परवाना प्राप्त इंजिनिअर/आर्किटेक्ट यांना वेळेत आणि नियमानुसार Plinth Intimation ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!