सोलापूर

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली! अध्यक्ष दीपक वैद्य यांचे जलसंधारण कामांना गती देण्याचे निर्देश

गावागावांतील नाल्यांची माहिती संकलित होणार; संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी नियोजनावर भर

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली! अध्यक्ष दीपक वैद्य यांचे जलसंधारण कामांना गती देण्याचे निर्देश

गावागावांतील नाल्यांची माहिती संकलित होणार; संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी नियोजनावर भर

जलसाठा वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना

सोलापूर : जल जीवन मिशनअंतर्गत कामे किरकोळ बाबी अभावी संबंधित गावांना प्रत्यक्षात पाणीपुरवठा होत नसेल, तर अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. हो पाणीपुरवठा सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावे असे स्पष्ट निर्देश सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सभापती दीपक वैद्य यांनी दिले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी, जलसंधारण योजनांची दुरुस्ती तसेच गावनिहाय नाल्यांची माहिती संकलित करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, जल व्यवस्थापन समितीचे सदस्य सिद्धाराम शिवमूर्ती, गीतांजली साळुंखे, शनमुखी कोरके, रश्मी हिप्परगी , वंदना कांबळे आदी उपस्थित होते.

तसेच समितीचे सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयेश हेडगिरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख उपस्थित होते.

जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना अधिक प्रभावी दिशा देण्यासाठी प्रत्येक गावातील नाल्यांची सविस्तर माहिती संकलित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जलसंधारण विभागातील संबंधित उपअभियंत्यांनी गावनिहाय नाल्यांची माहिती तयार करून ती संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणावी, असे निर्देश देण्यात आले. (MRSAC) यांनी विकसित केलेल्या ‘स्मार्ट व्हिलेज पोर्टल’चा वापर करण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिल्या. यामुळे गावातील जलस्रोतांची माहिती उपलब्ध होऊन जलसंधारणाच्या कामांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

पाणीटंचाईच्या काळात शेतीसाठी सिंचनाची उपलब्धता कायम राहणेही महत्त्वाचे आहे. महावितरण विभागाकडील विद्युत रोहित्र (डीपी) नादुरुस्त झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करावा. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी विद्युत पंप चालविताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिल्या.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना, जलसंधारणाच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी आणि पाणीपुरवठा योजनांच्या प्रत्यक्ष कार्यक्षमतेवर भर देत संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहावे, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!