सोलापूर महापालिकेची बँकिंग सेवा व CSR भागीदारीसाठी फेरनिविदा
अधिकाधिक पात्र बँकांना संधी; इच्छुक बँकांनी २ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सोलापूर महापालिकेची बँकिंग सेवा व CSR भागीदारीसाठी फेरनिविदा
अधिकाधिक पात्र बँकांना संधी; इच्छुक बँकांनी २ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी बँकिंग सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व (CSR) भागीदारी अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने पात्र बँकांकडून फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अधिकाधिक बँकांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार असून, स्पर्धात्मक व पारदर्शक प्रक्रियेला चालना मिळणार आहे.
महानगरपालिकेच्या बँकिंग सेवा व CSR भागीदारीकरिता मूळ जाहिरात क्र. CSR/2025-26/Banking/02, दि. १६ डिसेंबर २०२५ अन्वये स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागविण्यात आली होती. या प्रक्रियेला बँकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, अधिक पात्र बँकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याच अटी व शर्तींवर फेरनिविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार जाहिरात क्र. CSR/2025-26/Banking/02-RT अंतर्गत ३ नोव्हेंबर २०२६ पासून फेरनिविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र व इच्छुक बँकांनी आपले प्रस्ताव २ डिसेंबर २०२६ पर्यंत सोलापूर महानगरपालिकेकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर निविदेच्या अटी, शर्ती, पात्रता निकष आणि कार्यक्षेत्रासंबंधी सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक बँकांनी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन निविदा दस्तऐवजाची माहिती घ्यावी.
महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी सक्षम बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे तसेच CSR माध्यमातून शहराच्या विकासकामांना सहकार्य मिळविण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे.



