महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; सोलापुरात जोरदार आंदोलन

संपाचा इशारा नव्हे, प्रत्यक्ष कृती; राज्यभर कर्मचाऱ्यांचा एल्गार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; सोलापुरात जोरदार आंदोलन

संपाचा इशारा नव्हे, प्रत्यक्ष कृती; राज्यभर कर्मचाऱ्यांचा एल्गार

सोलापूर (प्रतिनिधी):- राज्य सरकारी तसेच निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला असून, संपाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद पूनमगेट येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनात सहभागी झाले.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या, विशेषतः सुधारित निवृत्ती वेतन योजनेच्या अधिसूचनेबाबत शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. शासनाशी सलोखा व संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनस्थळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत कर्मचाऱ्यांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. “शासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला.

या संपाचा परिणाम पहिल्याच दिवशी शासकीय कार्यालयांवर दिसून आला असून, अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या आंदोलनात खालील विविध कर्मचारी संघटनांचा सक्रिय सहभाग होता..

* राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, सोलापूर

* सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समिती, सोलापूर

* राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, सोलापूर

* सार्वजनिक बांधकाम चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, सोलापूर

* सिंचन कर्मचारी संघटना, सोलापूर

* सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना, सोलापूर

* महाराष्ट्र राज्य गृह विभाग कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सोलापूर

* महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग कर्मचारी संघटना, सोलापूर

* कोषागार कर्मचारी संघटना, सोलापूर

* महसूल कर्मचारी संघटना, सोलापूर

* भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, सोलापूर

* महाराष्ट्र स्टेट ऑडिट कर्मचारी संघटना, सोलापूर

* भूजल सर्वेक्षण कर्मचारी संघटना, सोलापूर

* मलेरिया कर्मचारी संघटना, सोलापूर

* परिवहन खाते कर्मचारी संघटना, सोलापूर

* जलसंधारण कर्मचारी संघटना, सोलापूर

* नर्सेस फेडरेशन, सोलापूर

* वाहन चालक कर्मचारी संघटना, सोलापूर

* सिव्हिल हॉस्पिटल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, सोलापूर

* नोंदणी कार्यालय कर्मचारी संघटना, सोलापूर

* शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी संघटना, सोलापूर

* राज्य कामगार विमा योजना रुग्णालय कर्मचारी संघटना, सोलापूर

* औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी संघटना, सोलापूर

* राज्य विक्रीकर कर्मचारी संघटना, सोलापूर

* अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटना, सोलापूर

* आरोग्य सेवा राज्य सरकारी संघटना, सोलापूर

* लघुन्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना, सोलापूर

* महाराष्ट्र राज्य आयटीआय निर्देशक संघटना, सोलापूर

* वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटना, सोलापूर

* समाज कल्याण कर्मचारी संघटना, सोलापूर

* मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ संघटना, सोलापूर

* आयटीआय लिपिक कर्मचारी संघटना, सोलापूर

* व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, सोलापूर

* महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना, सोलापूर

* एम.एस.ई. वर्कर फेडरेशन, सोलापूर

* महाराष्ट्र राज्य धर्मादाय कर्मचारी संघटना, सोलापूर

संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!