“सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दुहेरी धक्का; माणमधून बंधू तर औंधमधून भावजय पराभूत”
“सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दुहेरी धक्का; माणमधून बंधू तर औंधमधून भावजय पराभूत”
सातारा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. माण तालुक्यातून त्यांचे बंधू अरुण गोरे यांचा पराभव झाला असून, औंध गटातून त्यांच्या भावजयांचाही पराभव झाल्याने गोरेंच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील संबंधित गटात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूंनी जोरदार सभा, दौरे आणि मतदारांशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र अंतिम मतमोजणीत विरोधी उमेदवाराने आघाडी घेत विजय संपादन केला. परिणामी, अरुण गोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, औंध गटातही तत्सम परिस्थिती पाहायला मिळाली. येथेही चुरशीच्या लढतीनंतर अंतिम निकालात पालकमंत्र्यांच्या भावजयांचा पराभव निश्चित झाला. एकाच वेळी कुटुंबातील दोन महत्त्वाच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने गोरेंना दुहेरी राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.



